सभागृहाचे नियम व माहिती
• सभागृहाचे बुकिंग करतेवेळी रु. १०,०००/- रोख भरावेत.
• कार्याच्या होणा-या बिलाची संपूर्ण रक्कम अधिक रु. ५०००/- (अनामत रक्कम ) कार्याच्या अगोदर आठ दिवस आधी भरावी.
• सरकारी नियमांप्रमाणे सर्व्हिस टॅक्स व इतर टॅक्स भरावा लागेल.
• सभागृहाचा ताबा लग्नाचे आदले दिवशी संध्याकाळी ७ ते दुसरे दिवशी संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंतच राहील.
• कार्याच्या अगोदर १५ दिवस मेनू व होणारे पान निश्चित करावे. शक्यतो नंतर फ़ेरफ़ार करु नये.
• एकदा बुकिंग केल्यावर रद्द करता येणार नाही व तारीख बदलून मिळणार नाही.
• हॉलचा ताबा घेतल्यानंतर प्रथम कढी भाताचे जेवण व नंतर सीमांत पूजनाचा कार्यक्रम होईल.
• सीमांत पूजनाचा कार्यक्रम रात्री १२ पुर्वी संपवावा.
• दुपारच्या भोजनाची वेळ ३.०० वाजेपर्यंत राहील .जेवणाची पाने कमी झाल्यास त्याचे पैसे परत मिळणार नाहीत.
• हॉलमध्ये व हॉलच्या आवारात तसेच हॉलसमोर फ़टाके व बॅण्ड वाजवण्यास सक्त मनाई आहे.
• हॉलमध्ये रंगीत रांगोळी काढण्यास मनाई आहे.
• हॉलमध्ये गोंधळ करु नये. वाद्दे वाजवू नयेत व बाजूच्या लोकांना त्रास होईल असे वर्तन करु नये.
• हॉलचा ताबा मिळाल्यानंतर ताबा सोडेपर्यंत स्वत:ची कुलुपे लावावीत .हॉलची कुलुपे दिली जाणार नाहीत.
• मौल्यवान वस्तू स्वत:च्या जबाबदारीवर ठेवाव्यात.
• हॉलमध्ये येता-जाताना आपले सर्व सामान आणण्या-नेण्याची व्यवस्था आपली आपण करावी. हॉलचे कर्मचारी करणार नाहीत.
• हॉलमध्ये मांसाहार वर्ज्य आहे.तसेच दारु व इतर मादक पदार्थांचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे.
• हॉल बुकिंग करणा-या अथवा एका जबाबदार व्यक्तिने आमच्याशी संपर्क ठेवावा . इतरांनी ढवळाढवळ करु नये.
• लिफ़्टचा वापर शक्यतो वॄद्ध व स्त्रिया यांनी करावा.
• आमचे येथील कामगारास कामाचा योग्य मोबदला दिला जातो . कोणत्याही कामगारास बक्षिसी / टीप स्वरुपात पैसे देऊ नये.
• वरीलपैकी कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाल्यास व्यवस्थापक सभागृहाचा ताबा घेतील.
• व्हिडीओ शूटींग असल्यास रु. ५००/- वेगळा चार्ज पडेल.
• रात्री १०.३० ते सकाळी ६.३० केटरिंग व्यवस्था बंद राहील.
दिलेले सर्व दर आजचे आहेत . परिस्थितीनुरुप व पूर्वसूचनेनुसार त्यांत बदल करण्याचे अधिकार व्यवस्थापनाने राखून ठेवले आहेत.
व्हॅट व सर्व्हिस टॅक्स प्रचलित दरानुसार आकारला जाईल .