आमच्या विषयी

विवाहसमारंभ ’वरदश्री’ मध्ये असतो तेव्हा एक गोष्ट ह्मखास कानावर पडते ’दॄष्ट काढा वधुवरांची’ !

सहाजीक आहे, कारण स्थळ मनासारखं मिळाल्यानंतर कार्यस्थळही अगदी हवं तसं मिळालं की होणारा आनंद वधूवरांच्या चेह-यांवर अलगद उमटतोच !

अहो , फ़क्त वधू-वरच नाही तर व-हाडी मंडळी आणि आमंत्रित यापैकी प्रत्येकानं कार्य झोकात झालं म्ह्णावं,

अशी चोख व्यवस्था असते इथली आणि तीही इतकी आपुलकीनं की वाटावं, आमच्याच घरचं कार्य आहे !

गुलाबफुलांपासुन विडयांपर्यंत, म्हणजे आदल्या दिवशीच्या स्वागतापासुन ते भोजनसमारंभ आटोपून निरोपापर्यंत लागणा-या

प्रत्येक आवश्य़क गोष्टीची इथे जय्यत तयारी केली जाते . वर्षानुवर्षांचा अनुभव गाठीशी असल्यामुळे केटरिंग आणि बारीकसारीक तपशीलासह

संपूर्ण व्यवस्था काटेकोरपणे केली जाते. त्यामुळे आयत्या वेळची धावपळ, विलंब असे अनुभव तुम्हाला इथे कधीच यायचे नाहीत.

थोडक्यात काय, तर तुम्ही मुहूर्त ठरवा ...  

|| कार्य सिध्दीस नेण्यास वरदश्री समर्थ आहे ||